ABP Majha Headlines : 10 AM :11 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 AM :11 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महायुतीत ठाणे, नाशिक आणि साताऱ्याच्या जागेवरून एकमेकांवर दबावतंत्राचा वापर सुरू असल्याची चर्चा, ठाणे आणि नाशिक सोडण्यास शिवसेना तयार नाही तर भाजपही साताऱ्यावर ठाम
बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवडमध्ये विजय शिवतारेंकडून नागरिक संवाद मेळाव्याचं आयोजन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आज नांदेड दौरा, लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी अमित शाहांची नरसी येथे जाहीर सभा.
जागावाटपावरून मुंबई काँग्रेस विरुद्ध प्रदेश काँग्रेस अशा नव्या वादाला सुरुवात, वर्षा गायकवाड यांची थेट दिल्लीत तक्रार
काँग्रेसकडून लोकसभेसाठी आणखी दोन उमेदवारांची घोषणा, धुळ्यातून शोभा बच्छाव तर जालन्यातून कल्याण काळेंना उमेदवारी.
आज देशभरात साजरी होतेय ईद, दिल्लीच्या जामा मशिदीत पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांची रीघ
इंडिया आघाडी देशाचे तुकडे तुकडे करेल, कन्हानच्या प्रचार सभेतून मोदींचा जोरदार हल्लाबोल