ABP Majha Headlines : 11 AM : 17 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड, आदिवासी प्रकल्प अधिकारी असताना बोगस गायी म्हशींच्या वाटपाद्वारे अपहार
हिंसाचारानंतर नाशिक शहरात आज तणावपूर्व शांतता, ६ गुन्हे दाखल, १२ ते १५ जण अटकेत, पालकमंत्री दादा भुसेंनी बोलावली तातडीची बैठक
रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचे संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये पडसाद, २ ठिकाणी गुन्हे दाखल, रामगिरी महाराज मात्र वक्तव्यावर ठाम..
पुण्यात 'माझी लाडकी बहीण' योजनेचा आज राज्यस्तरीय शुभारंभ, उद्धाटनापूर्वीच ९६ लाख ३० हजार महिलांच्या खात्यात पैसे जमा
लाडकी बहीण योजनेचा आज पुण्याच्या बालेवाडीत भव्य सोहळा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरची अवजड वाहनांची वाहतूक २४ तासांसाठी बंद
मी उत्पन्नाची कागदपत्रे घेऊन येते, तुम्हीही आणा... अंजली दमानिया यांचं अजित पवारांना थेट आव्हान
भाजपच्या नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी आजपासून प्रक्रिया सुरू, दिल्लीत राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज बैठक, मोदी करणार बैठकीचा समारोप...
राहुल गांधी काँग्रेसच्या मुंबईतल्या सभेला येणार नाहीत, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती तर २० तारखेची सभासुद्धा बीकेसीऐवजी षण्मुखानंद हॉलमध्ये
कोलकात्यातल्या महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचा २४ तास देशव्यापी संप, तर विविध संघटनांचा जंतरमंतरवर मोर्चा
जुलैमध्ये ६७ हजार मेट्रिक टनांनी कांदा निर्यात घटली, कांद्याबाबत सरकारची धरसोडवृत्ती नडली, निर्यातीचा आलेख घसरताच
कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिसमधून आज मायदेशी परतणार, हरियाणात १२५ किमीपर्यंत ठिकठिकाणी होणार जंगी स्वागत