ABP Majha Headlines : 10 PM : 30 OCT 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP Majha
आमच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री आणि महायुतीची सत्ता, माझा व्हिजन कार्यक्रमात राज ठाकरेंचं मोठं भाकीत...तर राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून राज ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट
अमित ठाकरे मनसेच्या इतर उमेदवारांसारखाच, माझा व्हिजनमध्ये बोलताना राज ठाकरेंनी सांगितली अमित ठाकरेंच्या उमेदवारीची इनसाईड स्टोरी
धनुष्यबाण ही बाळासाहेबांची कमाई, मनसेची निशाणी ही ढापलेली नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे आणि शिंदेंना टोला
शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांनी एक्सवर पोस्ट टाकत, मागितलं राज ठाकरेंकडून समर्थन.. माहीममधून उमेदवारी मागे घेण्यासाठी सरवणकरांवर वाढता दबाव..
मनसुख हिरेनच्या हत्येबाबत माहिती होती की नाही हे अनिल देशमुखांनी स्पष्ट करावं, फडणवीसांचं थेट आव्हान... तर परमबीर, फडणवीस आणि वाझे एकत्रच, देशमुखांचा पलटवार
भाजपच्या तीव्र विरोधानंतरही अजित पवारांकडून नवाब मलिकांना उमेदवारी, माझा व्हिजनमध्ये फडणवीसांचा गौप्यस्फोट, तर ४ तारखेला चित्र स्पष्ट होणार असल्याचं म्हणत अजितदादांनी सस्पेन्स वाढवला