ABP Majha Headlines 10 AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 18 July 2024 Marathi News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines 10 AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 18 July 2024 Marathi News
वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक, शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून घेतलं ताब्यात
पावसाचा मुंबईतील वाहतुकीवर परिणाम,
पश्चिम दु्तगती महामार्गावर बोरीवली ते वांद्रे दरम्यान वाहतूक कोंडी, मुंबईकर खोळंबले
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली, पुढील काही तास पावसाचा इशारा
भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणाचे १९ दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले, ७८ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग..
छत्तीसगड महाराष्ट्रच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक... १२ माओवाद्यांना कंठस्नान... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कमांडोना ५१ लाखांचं बक्षीस
अजित गव्हाणेंनी हाती तुतारी घेतल्यावर अजित पवार खडबडून जागे, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक, नवा शहराध्यक्ष निवडण्याची शक्यता
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस ८० जागा लढवेल, कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची एबीपी माझाला एक्स्लुजीव माहिती, विदर्भातल्या २० जागा लढवण्याचा विचार..