ABP Majha Headlines : 10 AM : 17 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 10 AM : 17 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबईतील न्याय संकल्प पदयात्रेत राहुल आणि प्रियांका गांधी सहभागी, मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत पदयात्रा
राहुल गांधींची आज शिवाजी पार्कवर सभा, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईतून
शिवाजी पार्कच्या सभेला सोनिया आणि प्रियांका गांधींसह शरद पवार आणि उद्धव ठाकरे राहणार उपस्थित, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि फारुख अब्दुल्ला देखील हजेरी लावणार
चंद्रकांत खैरें आणि अंबादास दानवेंना मातोेश्रीवर येण्याचे आदेश, लोकसभेचं तिकीट कुणाला यावर उद्धव ठाकरे आजच निर्णय घेणार
ठाकरे गट किमान चार मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याच्या शक्यतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी, राजू शेट्टी मातोश्रीवर गेल्यानं देखील टेन्शन वाढलं
नंदुरबारमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी आज संध्याकाळी शिंदे गटात प्रवेश करणार
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यंदा शिरूरची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार, दोन ते तीन दिवसांत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज नवी दिल्लीत अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता