ABP Majha Headlines : 10 AM : 13 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 10 AM : 13 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
नाशिक लोकसभेची निवडणूक शांतीगिरी महाराज महाविकास आघाडीकडून लढवण्याची शक्यता, श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंचं नाव जाहीर केल्यानं शांतीगिरी महाराज नाराज
भाजपची दुसरी यादी आज घोषित होण्याची शक्यता, महाराष्ट्रातून किमान १३ ते १४ नावं जाहीर करणार
उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपकडून गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल यांना उमेदवारी जवळपास निश्चित, मात्र पूनम महाजन आणि मनोज कोटक यांच्याबाबत सस्पेन्स कायम
विजय शिवतारे आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार, बारामतीतून निवडणूक लढवायची का यावर चर्चा करणार
एनडीएचा भाग असूनही भाजप आम्हाला विचारात घेत नाही, आम्ही स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या तयारीत, 300 उमेदवार रिंगणात उतरवणार, बच्चू कडू यांचं आव्हान
आज राज्य मंत्रिमंडळाची आठवड्यात दुसऱ्यांदा बैठक, आचारसंहिता डोळ्यासमोर ठेवून मोठे निर्णय होण्याची शक्यता
आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक, अनेक मोठे निर्णय होण्याची अपेक्षा
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला नंदुरबारमधून सुरुवात, आज धुळे आणि मालेगावात यात्रा दाखल होणार, तर १७ मार्चला मुंबईतल्या शिवाजी पार्कात यात्रेचा समारोप.
पुण्यामध्ये ओला, उबरचा वाहतूक परवाना ‘आरटीए’ने फेटाळला,  अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत, प्रवासी वाहतूक मात्र सुरू ठेवता येणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram