ABP Majha Headlines : 10 AM : 13 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची रखडपट्टी, मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने, बिघाड दुरुस्तीनंतर वेळापत्रकावर परिणाम, प्रवाशांना मोठा फटका
बारामतीतल्या पराभवानंतर सुनेत्रा पवारांची संसदेत बॅकडोअर एन्ट्री, राज्यसभेसाठी शिक्कामोर्तब, आज अर्ज भरणार
सरकारच्या वतीने शंभूराज देसाई आज मनोज जरांगेंना भेटणार, जरांगेंच्या मागण्यांवर चर्चा करणार, उपोषण मागे घेण्यासाठी शंभूराजेंच्या शिष्टाईला यश येणार का याकडे लक्ष
बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधवांची जरांगेंशी चर्चा, सरकारने उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी, बजरंग सोनावणेंची राज्यपालांना पत्राद्वारे विनंती
अंतरवाली सराटीत आंदोलनाची हाक देणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी ताब्यात घेत दिली नोटीस, आज अंबडमधील ओबीसी बैठकीसाठी हाके रवाना
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडवर, आज राज ठाकरेंनी बोलावली बैठक, शपथविधी सोहळ्याच्या आमंत्रणावरून नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता
चार महिन्यांत राज्यातलं सरकार बदलणार, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा निर्धार...तर ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार, संजय राऊतांचा विश्वास...