ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 10 July 2024

Continues below advertisement

अपघातावेळी मीच गाडी चालवत होतो, वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहाची कबुली, पोलीस आज कोर्टात हजर करुन कोठडी मागणार..

मिहीर शाहच्या घरावर बुलडोझर चालवा, आरोपीला कोळीवाड्याच्या चौकात सोडा, आदित्य ठाकरेंची मागणी, नाखवा कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन

मुंबईत जुहूमधील ग्लोबल तापस बारवर कारवाई, बारच्या बाहेरील शेडचं अवैध बांधकाम बीएमसीने तोडलं, मिहीर शहाने याच बारमध्ये केलं होतं दारूचं सेवन

पुण्यात आता दारु पिऊन गाडी चालवली तर परवाना रद्द करण्याची कारवाई होणार, ६ महिन्यांत १६०० घटना घडल्याची माहिती समोर...

विधानसभेत अभूतपूर्व प्रसंग, सत्ताधारी आमदारांनीच बंद पाडलं कामकाज, ओबीसींच्या मुद्द्यावरुन विधानसभेचं कामकाज तीन वेळा तासाभरासाठी तहकूब

सरकारने विश्वासात न घेता ओबीसी आरक्षणाबाबत बैठक बोलावली, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा आरोप, अधिवेशनातच सरकार का मुद्दा मांडत नाही, वडेट्टीवारांचा सवाल

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram