ABP Majha Headlines : 6:30 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  6:30 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

मविआच्या बैठकीत विदर्भातल्या बहुतांश जागांवर चर्चा, आव्हाडांची माहिती..पितृपक्षानंतर जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता...आज पुन्हा बैठक
आजपासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती.. पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे, बंटी पाटील, अमित देशमुखांसह इतर नेत्यांवर उमेदवार निवडीची जबाबदारी
पुण्यातल्या कात्रज-कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद...हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा मराठा आंदोलकांचा दावा,  हाकेंची मेडिकल टेस्ट करण्याचीही मागणी
आरोपांची शहानिशा पोलीस करतील, पण मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, मराठा आंदोलकांसोबतच्या वादानंतर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी.....तर अजित पवार गट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत नसल्याचा शरद पवारांचा आरोप
मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा अहवाल आज शासनाला सादर करण्यात येणार, डॉक्टर सुधाकर शिंदेंच्या समितीने तयार केलेला अहवाल होणार सादर. 
राज्यात आठ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी केंद्राची मान्यता, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची एबीपी माझाला माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram