ABP Majha Headlines : 09 PM : 6 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी आधी त्यांच्या संपत्तीची चौकशी केली, मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

आनंद दिघेंचा असली शिष्य नरेश म्हस्के, मुख्यमंत्री शिंदेंचा राजन विचारेंना टोला, तर दिघेंकडून ठाणे जिल्हाध्यक्षपदही काढून घ्यायचा कट होता, मुख्यमंत्र्यांचा आरोप

आम्ही तोंड उघडलं तर शिंदेंना लोकांमध्ये फिरणं मुश्किल होईल, राजन विचारेंना मुख्यमंत्र्यांना इशारा.. तर मुख्यमंत्र्यांना कंटाळून म्हस्के सेना सोडत होते, विचारेंचा गौप्यस्फोट

मावळमधून सभेतून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली, शिंदेच बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार, फडणवीसांची टीका

वडेट्टीवारांचे आरोप खरे, निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, 'हु किल्ड करकरे' पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी मुश्रीफांची मागणी, आरएसएस, निकमांनी कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप

शांतीगिरी महाराज नाशिकमध्ये अपक्ष लढण्यावर ठाम, शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं

तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघासाठी उद्या मतदान... बारामतीसह रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदार राजा आपला कौल देणार

भोरमधील बुरुडमाळ गावात ७५ वर्षांत पहिल्यांदाच मतदान केंद्र स्थापन, ४१ मतदारांसाठी मतदान केंद्र, तर रायरेश्वर किल्ल्यावरील १६० मतदारांसाठी साहित्य किल्ल्यावर पोहोचवलं

पंतप्रधान मोदींचा उद्या महाराष्ट्र प्रचार दौऱा, अहमदनगर आणि बीडच्या अंबाजोगाईमध्ये सभा, तर उद्या तिसऱ्या टप्प्यासाठीही मतदान

निवडणुकांच्या रणधुमाळीत सामान्यांच्या घशाला कोरड, सांगलीच्या जत तालुक्यात दुष्काळाने पळवलं तोंडचं पाणी

झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई, झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता अटकेत,  विविध योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी ईडीकडून तपास सुरु, आतापर्यंत ३३ कोटी रुपये जप्त

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram