ABP Majha Headlines : 09 AM : 30 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

राज्यात मोठ्या प्रकल्पात केवळ १९ टक्के पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागात तीव्र टंचाई

राज्यात ११ हजार वाड्या वस्त्यांमध्ये भीषण पाणीटंचाई, धरणांनी गाठला तळ, टँकरच्या संख्येने गाठला उच्चांक, तब्बल २५ जिल्ह्यात भीषण स्थिती

येत्या ४८ तासांत आचारसंहिता शिथील होण्याची शक्यता, राज्यातल्या तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची शक्यता

मध्य रेल्वेवर १ आणि २ जूनला महामेगाब्लॉक..शुक्रवार ते रविवार दरम्यान लांब पल्ल्याच्या ७२ एक्स्प्रेस रद्द, सीएसएमटी आणि ठाणे स्थानकांच्या फलाट रुंदीकरणासाठी ३६ तासांचा ब्लॉक.. 

महाडमधलं आंदोलन आव्हाडांच्या अंगलट, बाबासाहेबांचा अवमान केल्याप्रकरणी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, भाजप आणि आरपीआय करणार आंदोलन, 

ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर, पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात वैद्यकीय शिक्षण विभागाची मोठी कारवाई, डॉ. अजय तावरेही निलंबित 

पुणे अपघातप्रकरणात खळबळजनक माहिती, अल्पवयीन मुलाऐवजी एका महिलेचं रक्त तपासणीला पाठवल्याचं अहवालात नमूद, रक्त मुलाच्या आईचं असल्याचा संशय

विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच.. मुंबई पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधरवर भाजपचा दावा, मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीनेही जाहीर केली उमेदवारी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram