ABP Majha Headlines : 09 AM : 17 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड, आदिवासी प्रकल्प अधिकारी असताना बोगस गायी म्हशींच्या वाटपाद्वारे अपहार
नाशिक शहरात कालच्या दंगलीनंतर आज तणावपूर्व शांतता, पालकमंत्री दादा भुसेंनी बोलावली तातडीची बैठक, दोन्ही बाजूच्या गटांवर गुन्हे दाखल
रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचे संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये पडसाद, २ ठिकाणी गुन्हे दाखल, रामगिरी महाराज मात्र वक्तव्यावर ठाम..
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांचा मुख्यमंत्री शिंदेंकडून संत असा उल्लेख, गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटलांचाही रामगिरींना साष्टांग दंडवत
पुण्यात 'माझी लाडकी बहीण' योजनेचा आज राज्यस्तरीय शुभारंभ, एका क्लिकवर जमा होणार एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये
लाडकी बहीण योजनेचा आज पुण्याच्या बालेवाडीत भव्य सोहळा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरची अवजड वाहनांची वाहतूक २४ तासांसाठी बंद
मी उत्पन्नाची कागदपत्रे घेऊन येते, तुम्हीही आणा... अंजली दमानिया यांचं अजित पवारांना थेट आव्हान
भाजपच्या नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी आजपासून प्रक्रिया सुरू, दिल्लीत राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज बैठक, मोदी करणार बैठकीचा समारोप...
राहुल गांधी काँग्रेसच्या मुंबईतल्या सभेला येणार नाहीत, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती तर २० तारखेची सभासुद्धा बीकेसीऐवजी षण्मुखानंद हॉलमध्ये 
महाराष्ट्रात दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता...गणेशोत्सव, दिवाळी आणि पितृपक्ष असल्याने अजून तारीख जाहीर नाही, निवडणूक आयोगाची माहिती...
अखिल भारतीय काँग्रेस समिती सदस्यपदी बाळासाहेब थोरातांची नियुक्ती, नसीम खानही समितीत विशेष निमंत्रित
जुलैमध्ये ६७ हजार मेट्रिक टनांनी कांदा निर्यात घटली, कांद्याबाबत सरकारची धरसोडवृत्ती नडली, निर्यातीचा आलेख घसरताच
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरुन घसरले, रुळावरील वस्तूला इंजिनाची धडक, आयबी, यूपी पोलिसांकडू तपास सुरु, रेल्वेमंत्र्यांची माहिती
कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिसमधून आज मायदेशी परतणार, हरियाणात १२५ किमीपर्यंत ठिकठिकाणी होणार जंगी स्वागत
दिल्ली हायकोर्टाचा कुस्ती महासंघाला दणका,  महासंघावर पुन्हा हंगामी समिती, बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिकच्या याचिकेवर निर्णय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram