ABP Majha Headlines 08 PM एबीपी माझा हेडलाईन्स 08 PM 06 July 2024 Marathi News

Continues below advertisement

हिंगोलीत मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात, रॅलीत हजारो मराठा बांधव सहभागी.

हिंगोलीत मराठा बांधवांकडून जरांगेंचं जंगी स्वागत, जरांगेंवर जेसीबीतून फुलांची उधळण करत आणि क्रेनने हार घालत स्वागत. 

भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करु नका, भुजबळांनी आपल्याविरोधात टीम तयार केली, मनोज जरांगेंचा हल्लाबोल.  

मराठ्यांच्या नोंदी असून त्यांना आरक्षण नाही, सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या, मनोज जरांगेंची मागणी, मराठ्यांचाही व्यावसाय शेती मग तरीही आरक्षण का नाही? जरांगेंचा सवाल. 

१३ तारखेंच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, अन्यथा आमचा निर्णय झेपणार नाही, आमच्या नादी लागलात तर सर्वांचा सुपडा साफ करु, जरांगेंचा इशारा.  

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण जनजागरण शांतता रॅलीचं उद्या परभणीत आयोजन, या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून तयारी पूर्ण, शहरातील वाहतुकीतही बदल करण्यात येणार.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram