ABP Majha Headlines : 08.00 AM : 21 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

विधानसभेसाठी भाजप आज रणशिंग फुंकणार...केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार मार्गदर्शन...विरोधकांच्या  नॅरेटीव्हवरही राजकीय प्रस्ताव मांडला जाणार...
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या नियमांवरुन दादा, ताई भिडले, निमंत्रित सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही, अजिदादांचा दावा...तर आम्हाला बोलण्याचा अधिकार, सुप्रिया सुळेंकडून गॅझेटचा दाखला 
अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकारणात काहीही घडू शकतं, साहेब-दादा एकत्र येऊ शकतात, बेनकेंच्या वक्तव्याने तर्क-वितर्काला वेग
भाजपच्या प्रवक्त्यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्तेही मैदानात.. काँग्रेसकडून प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर
३ वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत, विरोधकांची सरकारवर टीका, जाहीरात शासकीय नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रेदरम्यान ब्लॉक
मला देखील सिनेमा काढायचाय, त्यात अनेकांचे मुखवटे फाटतील, धर्मवीर २च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात फडणवीसांची टोलेबाजी
धर्मवीर-२ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च.. प्रसाद ओक यांचा गुरुपौर्णिमा विशेष परफॉर्मन्स.. तर मंचावर जात शिंदेंकडून आनंद दिघेंना मानवंदना. सलमान खानची उपस्थिती
प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकरांना २०२४ च्या पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित.. इन्फोसिसचे संस्थापक- अध्यक्ष नारायण मूर्तींच्या हस्ते सन्मान..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram