ABP Majha Headlines : 08 AM : 03 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 08 AM : 03 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, वाराणसीतून पंतप्रधान मोदी, गांधीनगरमधून अमित शाह तर पहिल्या यादीत २८ महिलांचा समावेश
महाराष्ट्रात मंत्री राहिलेल्या कृपाशंकर सिंह यांना युपीतील जौनपूरमधून उमेदवारी, तर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिहं चौहानही लोकसभेचे उमेदवार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ आणि ६ मार्चला महाराष्ट्र दौऱ्यावर, महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा सोडवणार, ५ तारखेला शाहांचा छत्रपती संभाजी नगर, अकोला, जळगाव दौरा
वंचित बहुजन आघाडीची मविआसोबत युती झालेली नाही, आघाडीच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नका, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन
शिरुरमध्ये आढळरावांना उमेदवारी देण्यापेक्षा मला किंवा महेश लांडगेंना द्या. विलास लांडेंचं अजित पवारांना आवाहन. तर आढळरावांना आयात करण्यापेक्षा भाजपला जागा सोडावी लांडेंची प्रतिक्रिया.
'छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र महाराष्ट्राला शिकवण्याची गरज' आमदार आबू आझमींचं विधान. तर सत्ताधाऱ्यांनी शिवरायांकडून काहीतरी शिकावं आझमींचं विधान.
रत्नागिरीतल्या जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे, 'माझा'च्या बातमीची केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून दखल, समुद्रात सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्याचे जेएसडब्ल्यू कंपनीला आदेश
मनोज जरांगे आज बीड आणि धाराशिवच्या दौऱ्यावर, आंदोलनाच्या पुढील वाटचालीबाबत मराठा बांधवांशी चर्चा करणार.
डोंबिवलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह, नेतेमंडळी उपस्थित राहणार.
नाशिकमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज सातवा दिवस, सोमवारी होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा
संत गजानन महाराजांच्या आज १४६ वा प्रगटदिन,यानिमित्त शेगावच्या गजानन महाराज मंदिरात आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन
आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर तर हार्बरवर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान मेगाब्लॉक.