ABP Majha Headlines : 07 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार.. १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान निवडणुका होणार, शरद पवारांनी वर्तवला अंदाज, अजितदादा फडणवीसांकडूनही नोव्हेंबरचाच मुहुर्त
आयात उमेदवार नको, हर्षवर्धन पाटलांच्या संभाव्य उमेदवारीला इंदापूरमधल्या पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
अजित पवार गटाच्या राजन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट..तर भाजप आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील पवारांच्या व्यासपीठावर हजेरी
शिंदे गट दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा आग्रह धरणार नाही, बीकेसी किंवा आझाद मैदानावर मेळावा होण्याची शक्यता.. तर ठाकरेंचा आवाज शिवाजी पार्कवर घुमण्याची चिन्ह
मनोज जरांगेंचा बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर मेळावा घेण्याचा निर्णय, कार्यकर्त्यांना कामाचं वाटपही झालं..
मराठ्यांच्या नादी लागाल तर राजकीय एन्काऊंटर करू, फडणवीसांनंतर मनोज जरांगेंचा अमित शाहांकडे मोर्चा, सगेसोयरेच्या अंमलबजावणीची पुन्हा आठवण
उल्हासनगरच्या स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन, पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अंत्यविधी..विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लिप आव्हाडांकडून ट्विट, अक्षय शिंदेला मारलं तेव्हा माझी गाडी मागेच होती, कथित ऑडिओ क्लिपमध्ये प्रत्यक्षदर्शीचा दावा