ABP Majha Headlines : 07 PM : 15 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 07 PM : 15 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदार पात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल.
अजित पवारांचा गटच खरी राष्ट्रवादी, निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांचाही निर्णय, शरद पवार गटाला मोठा धक्का.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार, शिवसेनेचाच निकाल काॅपी पेस्ट, सुप्रिया सुळेंची टीका, तर सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची सुळेंची एबीपी माझावर प्रतिक्रिया.
राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल, मिलिंद देवरा, प्रफुल पटेल, मेधा कुलकर्णी, अजित गोपछ़डेंसह अशोक चव्हाणांनी भरला अर्ज.
खासदारकीच्या दुसऱ्या टर्मसाठी अर्ज का भरला हे थोड्या दिवसात स्पष्ट होईल, प्रफुल पटेलांचं सूचक वक्तव्य, काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या, पटेलांचं विधान.
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे गटाचे अजय चौधरी, शरद पवार गटाचे राजेश टोपे उपस्थित.
 राजकीय पक्षांना निधी देण्यासाठीचे इलेक्टोरल बॉण्ड सुप्रीम कोर्टानं घटनाविरोधी ठरवले, २०१८ पासूनची सर्व माहिती स्टेट बँकेनं निवडणूक आयोगाला द्यावी, सुप्रीम कोर्टाचे आदेश.
मनोज जरांगेंची तब्येत आणखी खालावली, आंदोलकांच्या आग्रहानंतर जरांगेंनी पाणी घेतलं, आंदोलनस्थळी मोठी गर्दी.
मनोज जरांगेंनी उपचार घ्यावेत, जिल्हा शल्यचिकित्सक आणि डॉ. विनोद चावरे यांच्यामाध्यमातून उपचार घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना.
परभणीतील महायुतीच्या मेळाव्य़ात धनंजय मुंडेंच्या भाषणावेळी जोरदार घोषणाबाजी, हातात काळे झेंडे घेऊन मराठा तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram