ABP Majha Headlines 07 PM एबीपी माझा हेडलाईन्स 07 PM 06 July 2024 Marathi News
भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर १३ तारखेनंतरचा निर्णय झेपणार नाही, हिंगोलीतील रॅलीतून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा...
रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महापालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा, सत्यमेव जयते, वायकरांची माझाला प्रतिक्रिया.
आता फक्त दाऊदला क्लीनचीट द्यायचं बाकी, वायकरांच्या क्लीनचीटवरुन संजय राऊतांचा घणाघात, तर महायुतीकडे गेल्यानंतर वॉशिंगमशीनमध्ये धुतलं जात, पटोलेंचा टोला.
रवींद्र वायकरांच्या क्लीनचीटवर किरीट सोमय्यांचं नो कमेन्टस, प्रकरण कोर्टात म्हणत सोमय्यांनी बोलणं टाळलं.
षण्मुखानंद सभागृहात महायुतीचा महामेळावा, महायुतीचे सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार
विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला दिलेल्या ११ कोटी रुपयांच्या बक्षीसावरुन विरोधकांचा हल्लाबोल, राज्याच्या तिजोरीत खडखडाट, मग बक्षीस देण्याची गरज काय? विरोधकांचा सवाल.