ABP Majha Headlines : 07 AM : 14 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 07 AM : 14 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबईत पावसाची १९ जूनपर्यंत विश्रांती, सहन करावे लागणार उन्हाचे चटके, पुढील पाच दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नाही
लोकसभा निकालांनंतर अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, सकाळीच दौऱ्याला सुरूवात, पुण्यातील पूरस्थितीसंदर्भात बैठक आणि आषाढी वारी नियोजनाचाही आढावा घेणार
विधानसभा निवडणूक स्वबळावर नाही तर महाविकास आघाडीतूनच लढणार, एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत संजय राऊतांचं स्पष्टीकरण
भाजपची सुपारी गँग नसती तर मविआच्या ३८ जागा आल्या असत्या, माझाच्या मुलाखतीत संजय राऊतांचा राज ठाकरेंवर घणाघात
लोकसभा निवडणुकीत मराठी माणसानं उद्धव ठाकरेंना मत दिलं नाही, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य...उद्धव ठाकरेंबद्दल लोकांच्या मनात राग असल्याचाही दावा...
मुंबईतील मराठी माणसांनी ठाकरेंना मतदान केलं नाही तर आदित्य ठाकरेंच्या वरळीत त्यांना फक्त ६ हजारांची लीड मिळाली..भाजपच्या मेळाव्यातून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
सुनेत्रा पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल... बिनविरोध निवड होण्याची शक्यता...इच्छुक असूनही डावलल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा...
भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही? विश्व हिंदू परिषद नेत्यांचा सवाल, वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्यावरून तीव्र नाराजी