ABP Majha Headlines : 07 AM : 13 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडवर, आज राज ठाकरेंनी बोलावली बैठक, शपथविधी सोहळ्याच्या आमंत्रणावरून नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता
राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम, सुनेत्रा पवारांना की इतर नेत्यांना संधी मिळणार, आज उमेदवाराचं नाव जाहीर होणार
चार महिन्यांत राज्यातलं सरकार बदलणार, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा निर्धार...तर ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार, संजय राऊतांचा विश्वास...
विधानसभेत स्वबळावर लढण्यासाठी उद्धव ठाकरेंची चाचपणी...विधानसभा संपर्कप्रमुखांना अहवाल तयार करण्याच्या सूचना..
बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधवांची जरांगेंशी चर्चा, सरकारने उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी, बजरंग सोनावणेंची राज्यपालांना पत्राद्वारे विनंती
अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपचं नुकसान, संघाच्या मुखपत्रातून निकालाचं पोस्टमॉर्टम...मोदींच्या चेहऱ्यावर सर्व मतदारसंघात निवडणूक लढण्याला मर्यादा असल्याचं परखड मत...
दुष्काळाच्या छायेत असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा, पहिल्याच पावसात कोरड्या ठाक नद्या प्रवाहित, तर बीडमधील सरस्वती नदीला पूर
टी-ट्वेन्टी विश्वचषकात भारताचा सलग तिसरा विजय, अमेरिकेनं दिलेलं १११ धावांचं अव्हान भारताकडून १९ व्या षटकात पार, या विजयासह भारताचं सुपर एटचं तिकीट पक्कं.