ABP Majha Headlines : 07 AM : 03 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 07 AM : 03 March  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, वाराणसीतून पंतप्रधान मोदी, गांधीनगरमधून अमित शाह निवडणूक लढवणार 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ आणि ६ मार्चला महाराष्ट्र दौऱ्यावर, महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा सोडवणार,  ५ तारखेला शाहांचा छत्रपती संभाजी नगर, अकोला, जळगाव दौरा
डोंबिवलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह, नेतेमंडळी उपस्थित राहणार. 
ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंना मुंबई पोलिसांचं समन्स, शिवसेनेच्या खात्यातून ५० कोटी काढल्याचा शिंदे गटाची तक्रार, पाच मार्चला चौकशीसाठी बोलावलं 
मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीवरून महायुतीत वाद, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा कडाडून विरोध
मनोज जरांगे आज बीड आणि धाराशिवच्या दौऱ्यावर, आंदोलनाच्या पुढील वाटचालीबाबत मराठा बांधवांशी चर्चा करणार.
नाशिकमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज सातवा दिवस, सोमवारी होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा
पुण्यात पुन्हा सापडला ड्रग्जचा साठा, विश्रांतवाडी परिसरातून ३४० किलोचे ड्रग्ज जप्त, ड्रग्जसाठीचा कच्च्या मालासह ९ आरोपींना अटक
आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर तर हार्बरवर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान मेगाब्लॉक.
संत गजानन महाराजांच्या आज १४६ वा प्रगटदिन,यानिमित्त शेगावच्या गजानन महाराज मंदिरात आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram