ABP Majha Headlines : 06 PM : 11 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

शरद पवारांच्या पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा अजित पवारांना फोन, अमोल मिटकरींचा दावा, आपण शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, सोनवणेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह प्रतिक्रिया 

कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षकचे उमेदवार मागे घ्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

विधानपरिषदेच्या चारही जागा पारंपरिक मतदारसंघ असल्यानं जाहीर केले, हवं तर मी पटोलेंना फोन करतो, काँग्रेसच्या नाराजीवर अंबादास दानवेेंची प्रतिक्रिया 

नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघारीला सुरूवात, अपक्ष किशोर दराडे आणि संदीप गुळवेंनी मागे घेतले अर्ज, 

बारामतीत युगेंद्र पवारांच्या जनता दरबारात शरद पवारांची उपस्थिती, विधानसभा निवडणुकीत बारामतीतून युगेंद्र यांना तिकीट द्या, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी 

मराठा आरक्षणाबाबत पवारांनी नेतृत्व करावं, सकल मराठा समाजाचं आवाहन, नेतृत्व न केल्यास पवारांच्या घराबाहेरून राज्यव्यापी उपोषण आंदोलनाची सुरूवात करणार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram