ABP Majha Headlines : 05 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

अक्षय शिंदेचा मृतदेह आई-वडिलांनी घेतला ताब्यात, अँब्युलन्स कळव्याच्या हॉस्पिटलमधून उल्हासनगरकडे रवाना, स्मशानभूमीत अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त..

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लिप आव्हाडांकडून ट्विट, अक्षय शिंदेला मारलं तेव्हा माझी गाडी मागेच होती, कथित ऑडिओ क्लिपमध्ये प्रत्यक्षदर्शीचा दावाठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंचा नागपूर विमानतळावर रस्ता रोखून धरला, मालवणच्या राड्याचा हिशेब चुकता केल्याची चर्चा

पुणे मेट्रो आणि सोलापूरच्या विमानतळाचं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन, प्रत्यक्ष हजर राहता आलं नाही याबद्दल व्यक्त केली खंत..

सोलापूरातल्या विमानतळाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, पण सुभाष देशमुख वगळता इतर ११ आमदार आणि दोन खासदार कार्यक्रमापासून राहिले दूर..

मनोज जरांगेंचा बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर मेळावा घेण्याचा निर्णय, कार्यकर्त्यांना कामाचं वाटपही झालं..

महावितरणच्या हलगर्जीपणामुळं सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातल्या तिघांचा विजेचा धक्का लागून मृत्यु, तुटून पडलेल्या वायरला धक्का लागून वडील आणि दोन मुलांचा जीव गेला...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram