ABP Majha Headlines : 05 PM : 29 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 05 PM : 29 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

02 मार्चला बारामतीत नमो रोजगार मेळावा, मेळाव्याच्या कार्यक्रमपत्रिकेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचं नाव मात्र शरद पवारांचं नाव वगळलं, मात्र पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार
मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बारामतीत..शरद पवारांकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना गोविंदबागेत जेवणाचं आमंत्रण
नवी दिल्लीत थोड्याच वेळात सुरू होणार भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, ७० ते ८० उमेदवारांची पहिली यादी आज ठरेल अशी अपेक्षा
दोन दिवसांत मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार, २०-१८-१० या फॉर्म्युल्यावर अंतिम चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच, रत्नागिरी -सिंधुदुर्गची जागा भाजपच लढवणार, नारायण राणेंचा दावा, तर जिथे शिवसेनेचे खासदार, तिथे शिवसेनेचा दावा, उदय सामंतांचं वक्तव्य
शिरूर लोकसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच, तर मावळ मतदारसंघावर भाजपचाही दावा, महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करण्याची मागणी
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत, राहुल नार्वेकर आमने-सामने येण्याची शक्यता, ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, भाजपकडून राहुल नार्वेकर जवळपास निश्चित.
२०१४ मध्येच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंनी परस्पर १५१ प्लसची  घोषणाही केल्याचा आशिष शेलारांचा मोठा दावा
स्वतःच्या स्वार्थासाठी फडणवीस मराठ्यांच्या मुलांच्या मुंडक्यावर पाय देतात, जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल, खुन्नस म्हणून एसआयटी लावल्याचा आरोप
राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के मराठा आरक्षणाचा समावेश ओबीसी आरक्षणात करा, मनोज जरांगेंची मागणी, ओबीसींना मिळणारे फायदे मराठ्यांनाही देण्याची नवी मागणी
दहशतवादी सलिम कुत्ता डान्सप्रकरण सुधाकर बडगुजरांना भोवलं, सुधाकर बडगुजरांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल,राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा बडगुजर यांचा आरोप  
निलेश राणेंना मालमत्ता कर थकबाकीप्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा, तब्बल पावणेचार कोटींचा कर थकवला, मात्र २५ लाखांचा धनादेश देत कारवाईतून सुटका
मुंबई हायकोर्टाचा नेटफ्लिक्सला मोठा दिलासा, इंद्राणी मुखर्जीवरील वेब सीरीज प्रदर्शित करण्यास कोर्टाची परवानगी, सीबीआयची याचिका फेटाळली 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram