ABP Majha Headlines : 05 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 19 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

अजित पवार नवखे असल्यामुळे २००४ मध्ये त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिलं नाही, शरद पवारांचा गौप्यस्फोट...इतर कुुणाला मुख्यमंत्रिपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता, पवारांचा दावा...

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला भाजप आणि अजित पवारांचा विरोध होता, संजय राऊतांचा दावा, तर उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीच्या अट्टाहासामुळेच पक्षात फूट पडली, शिंदे गटाचं प्रत्युत्तर.

पक्ष फुटला नसता तर 2004 मध्ये मीच मुख्यमंत्री झालो असतो... शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया...

भाजप नेते विनोद तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, मुंबईतल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या 13 जागांसाठी उद्या मतदान...तयारी पूर्ण...महामुंबईतल्या महामुकाबल्याक़डे सर्वांचं लक्ष.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंब्र्यातील शाखेला भेट, मतदानाच्या आधी मुख्यमंत्री मुलाच्या मतदारसंघात.

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत मोठा गोंधळ...समर्थक अनियंत्रित झाल्यानं भाषण न करताच राहुल गांधी गेले.

पुण्यात स्पोर्ट्स कारच्या धडकेत दुचकीवरच्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू...आरोपी वेदांत अग्रवाल हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालांचाा मुलगा.

मान्सून आज अंदमानात दाखल  तर ३१ मे रोजी केरळ आणि ७ जूनला महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram