ABP Majha Headlines : 05 PM : 19 August : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 05 PM : 19 August : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

हे देखील वाचा

Sharad Pawar : संभाजी भिडे काही बोलण्याच्या लायकीचे आहेत का? शरद पवार अचानक का भडकले?

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला असताना त्यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. मराठ्यांना कशाला हवंय आरक्षण असा प्रश्न संभाजी भिडे यांनी केला. त्यावर संभाजी भिडे काही बोलण्याच्या लायकीचे व्यक्ती आहेत का असं म्हणत शरद पवार प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवरच भडकले. मराठ्यांनी आरक्षण का मागावं? मराठ्यांना देश चालवायचा आहे, मराठा ही देशाचा संसार चालवणारी जात आहे असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यावर बोलताना शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. 

Sambhaji Bhide On Maratha Reservation : काय म्हणाले होते संभाजी भिडे? 

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली होती. मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला होता. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, पण मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठले काढले? मराठा जात संपूर्ण देशाचा संसार चालवणारी जात आहे हे ज्यावेळी मराठ्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. मात्र हे मराठ्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे असं संभाजी भिडे म्हणाले होते.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram