ABP Majha Headlines : 05 PM : 02 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 05 PM : 02 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
बारामतीत महारोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर, विविध विकासकामांचं लोकार्पण
नमो रोजगार मेळाव्यातून खरंच नोकऱ्या मिळणार की ट्रेनी भरती, सुप्रिया सुळेंचा सवाल, ४३ हजार तरूणांना रोजगार देण्याचा दावा तपासण्याचा सल्ला
रोजगारनिर्मितीबाबत सरकारच्या सर्व प्रयत्नांना साथ, पवारांचं वक्तव्य, व्यासपीठावर अजित पवार - शरद पवारांनी भेट टाळली
अजित पवारांना फडणवीसांचा मिश्कील टोला... दादा, गृहमंत्रीपद देणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य
नव्या शैक्षणिक धोरणाची जूनपासून अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांची मान्यता काढणार..., उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा
बेस्ट बसच्या पास दरवाढीवर आदित्य ठाकरेंची टीका, तातडीने पासची भाडेवाढ मागे घेण्याची आदित्य ठाकरेंची मागणी
पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं उद्घाटन ६ मार्चला होणार, पंतप्रधान मोदी ऑनलाईन दाखवणार हिरवा कंदील