एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 04 PM TOP Headlines 04 PM 21 September 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवडीगोद्रीत हाकेंच्या उपोषणस्थळी तणावाचं वातावरण, मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी
महाविकास आघाडीची २८८ जागांवर चर्चा आणि सहमती, संजय राऊतांची एबीपी माझाला एक्स्लुजीव माहिती, कुठल्याच जागेवर मतभेद नाहीत असाही दावा..
एखाद्या समाजाला समोर ठेवून टीका करणार असाल तर चालणार नाही, अजित पवारांनी नितेश राणेंंचं नाव न घेता सुनावलं...तर, महायुतीमध्ये गेलो असलो तर फुले-शाहू-आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही, सुनील तटकरेंचा दावा...
पिंपरीत भाजप आणि राष्ट्रवादीत मोठा बेबनाव, अजित पवारांच्या उमेदवारांचा प्रचार न करण्याचा भाजपचा ठराव..
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा वाद अखेर हायकोर्टात, निवडणूक स्थगित करण्याविरुद्ध आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेची याचिका..
महाराष्ट्र सरकारला नोटीस देण्याचे नितीन गडकरींचे आदेश, मुंबई-पुणे जुना हाय वे आणि कल्याण-नगर रस्त्यांच्या दुरवस्थेवरुन गडकरी नाराज...
अठरा मागण्या केल्या पण मग्रुर सरकारनं पूर्ण केल्या नाहीत, बच्चू कडूंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, मनोज जरांगे यांची २६ सप्टेंबरपर्यंत वाट पाहणार...
परभणीत सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस, उरलीसुरली पिकंही हातातून जाण्याची भीती..