ABP Majha Headlines : 04 PM : 29 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

मुख्यमंत्री शिंदेंची संजय राऊतांना मानहानीची नोटीस, तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, सामनामधील रोखठोकवरुन नोटीस, तर ट्विट करत राऊतांकडून नोटीशीची खिल्ली

जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचं दहन, महाडमध्ये जोरदार आंदोलन, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतले श्लोक समाविष्ट करण्यास विरोध

जितेंद्र आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान, आमदार अमोल मिटकरींचा आरोप, जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी 

पुणे अपघात प्रकरणात आरोपी कितीही मोठा असला तरी कारवाई करा, पुणे पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांची कडक शब्दात समज

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सदस्याची चौकशी होणार, समिती स्थापन

अपघात प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी डॉ. तावरेच्या जिवाला धोका निर्माण केला जाऊ शकतो, सुषमा अंधारेंचा आरोप...तर चमकोगिरीसाठी विरोधक आरोप करतात शिरसाटांचा पलटवार

पुण्यापाठोपाठ नागपुरातही हिट अँड रनची घटना, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या दोन महिलांना कारने उडवलं, आरोपी मोकाट,पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरं, कुटुंबीयांचा आरोप 

पालघरजवळ घसरलेले मालगाडीचे डबे बाजूला करण्याचं काम पूर्ण..  पश्चिम रेल्वेवरील लांबपल्ल्याच्या गाड्यांची धीम्या गतीने वाहतूक सुरू तर दोन ते तीन तासांत लोकलची वाहतूक सुरू होण्याची शक्यता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram