ABP Majha Headlines : 04 PM : 19 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

'विरोधकांच्या  आरोपांकडे लक्ष देऊ नका' आमचं सरकार सर्वसामान्यांसाठी काम करतं- अजित पवार

विधानसभेला काँग्रेस मविआत सर्वाधिक जागांवर दावा करणार, काँग्रेसच्या बैठकीत चर्चा, तर विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवरील कारवाईचा निर्णय दिल्लीत होणार

मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये मोठा तांत्रिक बिघाड, जगभरात बँक, हवाईसह अनेक सेवांचा खोळंबा,भारतात इंडिगो, स्पाइसजेट, अकासाची विमानसेवा बाधित

मायक्रोसॉफ्ट बिघाडाचा भारतीय शेअर बाजारावरही परिणाम, काही ऑनलाईन ब्रोकरेज हाऊस प्रभावित, ट्रेडिंग करण्यात समस्या

पूजा खेडकरांविरुद्ध युपीएससीकडून गुन्हा दाखल, निवड रद्द का करु नये आणि पुढच्या परीक्षांना बंदी का घालू नये अशी कारणे दाखवा...

लंडनहून आलेल्या वाघनखांचं साताऱ्यात अनावरण, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा 

विशाळगडावरच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती, भर पावसाळ्यात कारवाई का केली असा सरकारला सवाल..

मुंबई हायकोर्टाचा सरकारला दणका, शिक्षण हक्क कायद्यातून खाजगी आणि विनाअनुदानित शाळांना वगळण्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द, अचानक निर्णय घेणं घटनाबाह्य असं निरीक्षण ..

भाजपा आता रोज सकाळ-संध्याकाळ प्रतिक्रिया देणार,सकाळी ९ वाजता आणि दुपारी ४ वाजता बोलण्यासाठी १० बड्या नेत्यांची टीम जाहीर, विभागवार बोलायलाही २० जणांची टीम..

झारखंडमध्ये पोलिसांचाच पोलिसांवर लाठीमार, पगारवाढीसाठी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या स्पेशल पोलीस अधिकाऱ्यांवर लाठीमार...

शरद पवारांची आणखी एक मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य, ट्रम्पेट चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवल्याचा पवार गटाचा दावा..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram