ABP Majha Headlines : 04 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपद मलाच मिळणार, सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा सुरू असताना प्रफुल पटेल यांचं मोठं वक्तव्य
((मंत्रिपदाच मलाच मिळणार-पटेल))
भाजपच्या मदन भोसलेंविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल, किसनवीर साखर कारखान्यात घोटाळा केल्याचा ठपका, बँक ऑफ इंडियाचे ६० कोटी बुडवल्याचा आरोप.
वायकरांच्या मेहुण्याने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन, मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाच्या
ऑपरेटरवर गुन्हा दाखल,दोघांवर अटकेची टांगती तलवार
ईव्हीएमवरून आरोप म्हणजे विरोधकांचा रडीचा डाव, मतमोजणी सुरू असताना तिथं हजारो पोलीस तैनात होते, रवींद्र वायकर यांनी फेटाळले आरोप
((विरोधकांचा रडीचा डाव-वायकर))
ईव्हीएम हॅक होण्याचा धोका कायम, त्यांचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे, टेस्लाचा सीईओ एलन मस्कचं मत, तर भारतीय ईव्हीएम हॅक करणं अशक्य, माजी केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांचं प्रत्युत्तर
((ईव्हीएम हॅक करणं शक्य-एलन मस्क))
संदीप क्षीरसागर यांचे वडील आणि बंधू जयदत्त क्षीरसागरांसोबत एकाच मंचावर, जयदत्त क्षीरसागर कोणती
भूमिका घेणार याकडे लक्ष
ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरजच काय, बबनराव तायवाडेंचा उपोषणकर्त्या हाकेंना सवाल, तर ओबीसी आरक्षणला विरोध करणाऱ्यांचे उमेदवार पाडणार ... प्रकाश शेंडगेंचा इशारा
शीना बोराचे अवशेष गहाळ होणं अतिशय धक्कादायक, आरोपी इंद्राणी मुखर्जीची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया, शीना जिवंत असल्याचा पुनरुच्चार
((शीना जिवंत आहे-इंद्राणी मुखर्जी))
सलमान खानला युट्यूबवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला राजस्थानमधून अटक, बिष्णोई गँगशी संबधित बनवारीलाल गुज्जरला मुंबई गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या
एसटीचा पास आता थेट शाळेत मिळणार, पास केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहण्याचा त्रास टळणार
((एसटीचा पास थेट शाळेत मिळणार!))
शिर्डीतील साईबाबांना ४३ लाखांचा सोन्याचा मुकूट अर्पण, देणगीदाराकडून नाव जाहीर न करण्याची संस्थानाला विनंती
((साईंच्या चरणी ४३ लाखांचा मुकुट))
गजानन महाराजांच्या पालखीचा सध्या अकोल्यात मुक्काम, पुढच्या प्रवासासाठी उद्या सकाळी मार्गस्थ होणार
((गजानन महाराजांच्या पालखीचा अकोल्यात मुक्काम ))