ABP Majha Headlines : 04 PM : 14 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

खासदारकीची इच्छा आहेच, म्हणूनच नाशिकमधून लढायला तयार होतो, भुजबळांचं वक्तव्य, एक महिना उलटूनही निर्णय न झाल्याने माघार, भुजबळांची प्रतिक्रिया

पक्षात कोणी नाराज नाही.... भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण...तर ऑर्गनायझरमधील लेखावर बोलणं टाळलं

पुण्यात खासदार निलेश लंकेंनी घेतली गुंड गजा मारणेची भेट, तर गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नव्हती, भेटीवर निलेश लंकेंचं स्पष्टीकरण

निलेश लंकेंनी गजा मारणेंची भेट घेणं चुकीचच, लंकेंना जाब विचारणार, आमदार विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया

शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांना क्लिनचीटला अण्णा हजारेंचा आक्षेप,  क्लोजर रिपोर्टला हजारे देणार आव्हान, याचिका दाखल 
करण्यास हजारेंना कोर्टाने दिला वेळ

शरद पवारांच्या प्रभावामुळे गेम पालटला, लोकसभा निवडणुकीत चांगलं यश, जयंत पाटलांचं वक्तव्य, इस्लामपुरात जयंत पाटलांचं शानदार स्वागत

राज ठाकरे जुलै महिन्यात राज्याचा दौरा करणार,  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन आणि निवडणुकीची तयारीसंदर्भात राज ठाकरेंचा दौरा

संघाने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार १५ मिनिंटही टिकणार नाही, राऊतांचं वक्तव्य, फडणवीसांनी राज्यात राजकीय अंडरवर्ल्ड गँग बनवली, राऊतांची टीका

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर वायनाड पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढवण्याची चिन्ह

जे अहंकारी झाले त्यांना २४० वरच रोखलं, आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांच्या कानपिचक्या तर रामविरोधी लोकांना २३४ जागांवर  रोखलं, कुमारांचं टीकास्त्र

कांद्यासंदर्भात नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले, कांद्याचे दर आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार, पराभवाचं कारण ठरलेल्या कांदा प्रश्नावप तोडग्याचे केंद्राचे प्रयत्न

नागपूर स्फोटातील मृकांच्या कुटुंबियांनी नागपूर-अमरावती रोखला, तात्काळ मदत मिळावी कुटुंबियांची मागणी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार डोला करीम आणि त्याच्या मुलाविरोधात लवकरच रेड कॉर्नर नोटीस, वर्षभरात तब्बल १ हजार कोटींची ड्रग
तस्करी केल्याचा आरोप

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram