
ABP Majha Headlines : 04 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 04 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
जिथे पक्षप्रवेश करतोय तिथे बाळासाहेब आणि शिवधनुष्य आहे. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी राजन साळवींची एबीपी माझाला प्रतिक्रिया
दिल्ली दौऱ्यात आदित्य ठाकरेंच्या मॅरेथॉन गाठीभेटी.. रात्री राहुल गांधी तर दुपारी केजरीवालांसोबत चर्चा...पवारांची भेट घेणार नसल्यानं चर्चा ...
शिंदे गटाकडून आयोजित जेवणावळींना खासदारांनी परवानगीशिवाय जाऊ नये, आदित्य ठाकरेंनी बजावलं... सूचनेवर खासदार नाराज असल्याची चर्चा
दिल्लीत दोन्ही शिवसेना खासदारांच्या जेवणावळी, प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला ठाकरेंचे तीन खासदार...तर नागेश पाटील आष्टीकरांच्या स्नेहभोजनाला शिंदेच्या खासदारांची हजेरी...
एकनाथ शिंदेंच्या सत्कारातून ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक बातमी, संजय दिना पाटलांची आधी शिंदेंच्या सत्काराला हजेरी नंतर श्रीकांत शिंदेंकडे स्नेहभोजन...
शिवसेना खासदार संजय जाधवांची माध्यमांशी अरेरावी, दिल्लीतल्या जेवणावळींवरचा प्रश्न जाधवांना झोंबला, जाधवांनी पक्षशिस्त ओळखावी, अरविंद सावंतांचं वक्तव्य
उमेदवारी दाखल करताना माहिती लपवल्याबद्धल परळीच्या फौजदारी न्यायालयाची धनंजय मुंडेंना नोटीस, करुणा मुंडेंच्या तक्रारीवरून दाखल खटल्यात कारणे दाखवा नोटीस...करुणा मुंडेंनी मानलेत मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार...