ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 13 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 13 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
जिथे पक्षप्रवेश करतोय तिथे बाळासाहेब आणि शिवधनुष्य आहे. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी राजन साळवींची एबीपी माझाला प्रतिक्रिया
दिल्ली दौऱ्यात आदित्य ठाकरेंच्या मॅरेथॉन गाठीभेटी.. रात्री राहुल गांधी तर दुपारी केजरीवालांसोबत चर्चा...पवारांची भेट घेणार नसल्यानं चर्चा .
शिंदे गटाकडून आयोजित जेवणावळींना खासदारांनी परवानगीशिवाय जाऊ नये, आदित्य ठाकरेंनी बजावलं... सूचनेवर खासदार नाराज असल्याची चर्चा
दिल्लीत दोन्ही शिवसेना खासदारांच्या जेवणावळी, प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला ठाकरेंचे तीन खासदार...तर नागेश पाटील आष्टीकरांच्या स्नेहभोजनाला शिंदेच्या खासदारांची हजेरी...
एकनाथ शिंदेंच्या सत्कारातून ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक बातमी, संजय दिना पाटलांची आधी शिंदेंच्या सत्काराला हजेरी नंतर श्रीकांत शिंदेंकडे स्नेहभोजन...
'इंडियाज लेटेंट शो'च्या वादानंतर सारंग साठेचे 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' चर्चेत, भाडिपाकडून पोह्यांच्या सर्व पोस्ट डिलीट, वॅलेन्टाईन्स डेनिमित्त आयोजित सई ताम्हणकरचा खास कार्यक्रमही रद्द
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरोधात अभाविपचा महाआक्रोश मोर्चा, फेरमूल्यांकनाचे बदललेले निकष रद्द करण्यासह ६१ मागण्यांसाठी अभाविप आक्रमक...