ABP Majha Headlines : 03 PM : 18 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement


एक देश एक निवडणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, सूत्रांची माहिती...लोकसभा आणि देशातल्या सर्व विधानसभांची निवडणूक एकत्र घेण्याचा प्रस्ताव...

गणपती विसर्जनानंतर महायुती आणि मविआकडून जागावाटपाच्या चर्चेचा श्रीगणेशा, मुंबईसाठी मविआची आज खलबतं, तर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उद्या बैठक

महायुतीचं जागावाटप सप्टेंबर अखेरीस पूर्ण होणार, ज्या जागांवर एकमत होणार नाही त्यावर अमित शाह निर्णय घेणार, एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती

पक्षांतर्गत नाराजीबद्दल अजितदादांनी बोलावली सर्व आमदारांची बैठक, महामंडळ वाटपासंदर्भात अजितदादा आणि फडणवीस मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

राहुल गांधींची जीभ छाटू नका तर जीभेला चटके द्या, आमदार संजय गायकवाडांनंतर भाजप खासदार अनिल बोंडेंची मुक्ताफळ, काँग्रेसचं उद्या राज्यभर आंदोलन


राहुल गांधींवर हल्ल्याचा कट, संजय राऊतांचा गंभीर आरोप, गृहमंत्र्यांवरही व्यक्त केला संशय, तर केंद्र सरकार संरक्षण करण्यास सक्षम, बावनकुळेंचं प्रत्युत्तर


मागण्या मान्य न केल्यास राजकीय करियर उद्धवस्त करेन, दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगेंचा इशारा, तर जरांगेंच्या विरोधात ओबीसींच्या वतीनं अंतरवालीतच मंगेश ससाणेंचं उपोषण

नवाब मलिकांचा जावई समीर खान यांचा भीषण अपघात, ड्रायव्हरनं ब्रेकच्या ऐवजी अॅक्लिलरेटर दाबल्यानं कार समीर यांना घेऊन भिंतीवर धडकली
((नवाब मलिकांचा जावयाचा भीषण अपघात))

२४ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या अनंत अंबानींचा एबीपी माझाशी संवाद, पुढच्या वर्षी लवकर येण्याची साद

तब्बल २९ तासांनंतर पुण्यातील विसर्जन मिरवणूक संपली, लक्ष्मी रोड,केळकर रोड,टिळक रोडवर अनेक तास वाहतूक कोंडी, पोलिसांची दमछाक

जम्मूू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्यावर प्रथमच मतदान, ७ जिल्ह्यातील २४ जागांवर मतदान सुरू, १ वाजेपर्यंत ४१.२ टक्के मतदारांनी बजावला हक्क 

लेबनॉनमधील पेजर स्फोटकांडात हिज्बुल्लाह प्रमुखाच्या मुलासह ११ जणांचा मृत्यू, ४००० जखमी, इस्रालयला योग्यवेळी उत्तर मिळेल, हिज्बुल्लाहचा इशारा, अमेरिकेने हात असल्याचे आरोप फेटाळले

लेबनॉन पेजर स्फोटासाठी मोसादचं ऑपरेशन बिलो द बेल्ट... तैवानमध्ये तयार झालेल्या बॅटऱ्यांच शिपमेंट बदललं, बॅटऱ्यात स्फोटकं बसवल्याचं उघड

स्त्री 2 सिनेमाची पाच आठवड्यात ५८६ कोटींची रेकॉर्ड ब्रेक कमाई... महिन्याभरातच सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram