ABP Majha Headlines :  03 PM : 21 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाची सरकारकडून दखल, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पोलीस आयुक्तांना फोन, दबावाला बळी न पडता कठोर कारवाईचे आदेश

मतदानाच्या गैरसोयीची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल, मुख्य सचिव नितीन करीर यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश

उद्धव ठाकरेंच्या बोटाला हिरवी शाई, कमी मतदानाच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर आशिष शेलारांचा हल्लाबोल

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा शंभर टक्के प्रचार केला नाही, मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंची खदखद, तर कार्यकर्ते मनापासून झटले, उन्नीस-बीस होऊ शकतं, उमेश पाटील यांची प्रतिक्रिया

राज्याचा बारावीचा ९३.३७ टक्के निकाल, कोकण विभाग अव्वल तर छत्रपती संभाजीनगरमधील रेणुका बोरमणीकरला १०० टक्के गुण

नागपुरात खोट्या कागदपत्रांद्वारे आरटीई अंतर्गत नामांकित शाळांमध्ये प्रवेश, एका पालकाला बेड्या तर १९ पालकांविरोधात गुन्हा दाखल

मराठवाड्यात जलसाठ्याने तळ गाठला, हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत, टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड

आचारसंहितेचे नियम शिथिल करुन चारा उपलब्ध करुन द्या, अंबादास दानवेंची मागणी, तर अनेक जिल्ह्यात ४५ दिवस पुरेल एवढा चारा, मंत्री विखे पाटलांचा दावा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram