ABP Majha Headlines : 08 AM : 02 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 08 AM : 02 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर शरद पवारही लावणार हजेरी.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं निमंत्रण नाकारलं, नियोजित कारण देत मुख्यमंत्र्यांचं पवारांना पत्र.

नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आज सहावा दिवस, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती, लेखी आश्वासन मिळेपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम.

मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवेंची धक्काबुक्की, धक्काबुक्कीचं सीसीटीव्ही फुटेज सभागृहात दाखवा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी, तर अख्ख्या महाराष्ट्राला सीसीटीव्ही दाखवा, दादा भुसेंचं प्रत्युत्तर.

गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचेच शिष्य, फडणवीस एका हातानं देतात आणि दुसऱ्या हातातून काढून घेतात, मनोेज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल.

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात, मध्यप्रदेशच्या हजीरमध्ये भव्य रॅली, कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचं कमलनाथ यांचं आवाहन.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून रामदास कदमांचा भाजपवर हल्लाबोल, सर्व पक्षांना संपवून फक्त भाजपला जिवंत राहायचंय का, कदम यांची टीका.

नितीन गडकरींची मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश यांना नोटीस, वक्तव्याची मोडतोड करुन लोकांची दिशाभूल केल्याचा गडकरींचा आरोप.

राज्यात १७ हजार पदांची पोलीस भरती होणार, ही भरती १० टक्के मराठा आरक्षणासह होणार असल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती.

सिंधुदुर्गमधील आंगणेवाडीत भराडीदेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी, नेते मंडळीही यात्रेत सहभागी होणार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram