ABP Majha Headlines : 02 :00 AM : 18 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
उद्धव ठाकरे मुंबईत राबवणार शिव सर्वेक्षण अभियान, १८ नेते आणि १८ सहायकांवर सोपवली ३६ मतदारसंघांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी..
साताऱ्यात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना महिलांनी बांधल्या राख्या...
महायुतीला गालबोट लावणाऱ्यांना भाजपने ताकीद द्यावी, काळे झेंडे दाखवल्यानंतर सुनील तटकरेंची कठोर भूमिका तर फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी मिटकरींची मागणी
जुन्नरमध्ये भाजपच्या आशा बुचके आणि कार्यकर्त्यांकडून अजित पवारांना काळे झेंडे, पर्यटनाच्या बैठकीत डावलल्यानं कार्यकर्ते आक्रमक...
अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचा कर्जत-जामखेड दौरा, आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात अचानक दौरा केल्याने चर्चांना उधाण
दंगलीनं कुणाचाही फायदा होत नाही, नाशिकचा विकास थांबेल, छगन भुजबळांनी करुन दिली जाणीव...नाशिकला दंगलीचं शहर म्हणून पुढं आणू नका असं आवाहन..
महाविकास आघाडीला १७५ ते १८० जागा मिळतील, संजय राऊतांनी वर्तवला अंदाज, राष्ट्रवादी आणि शिवसेना सोडून गेलेले अनेक जण परतण्यासाठी इच्छुक असा दावा..
सोशल मीडियासाठी शिवसेनेचा नवा चेहरा, राहुल कनाल यांच्या खांद्यावर जबाबदारी, सोशल मीडिया राज्यप्रमुख पदी वर्णी
मराठ्यांनी आरक्षण का मागावं, संभाजी भिडे यांचा सवाल, मराठ्यांनी देश चालवायचा सोडून आरक्षण मागतायत असं वक्तव्य..
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपमध्ये जाण्याची शक्यता, आज कोलकात्याहून दिल्लीला जाणार, सोरेन यांना तीन आमदारांची साथ...
नंदुरबारमध्ये कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, अनियंत्रित कारने चौघांना उडवलं, दोघे ठार..
मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, ३ कोटी ३३ लाखांची सोन्याची पावडर जप्त..
उद्या दिवसभर कधीही बांधा राखी, रक्षाबंधनाला भद्रा काळ वर्ज्य नसल्याचं पंचांगकर्ते मोहन दाते यांचं स्पष्टीकरण