ABP News

ABP Majha Headlines : 01 PM : 31 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

मनोज जरांगे यांना पुणे कोर्टाचा दिलासा, अटक वॉरंट रद्द, २०१३ मधील  फसवणुकीच्या गुन्ह्यात ५०० रुपयांचा दंड

उद्धव ठाकरेंची निवडणुकीच्या दिवशीची पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात, निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर, काय पावलं उचलणार याकडे लक्ष

मनसे पदवीधर निवडणूक लढवण्यावर ठाम, अभिजीत पानसे उद्या अर्ज भरणार, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

इंडिया आघाडी ४८ तासांत पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणार,  जयराम रमेश यांचं वक्तव्य, जागांनुसार फॉर्म्युला ठरण्याची शक्यता

केजरीवाल २ जूनला तिहार जेलमध्ये सरेंडर करणार, हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय, केजरीवालांची प्रतिक्रिया

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंची मतमोजणीआधी बदली करा, प्रांत अधिकाऱ्याची मागणी, राजकीय दबावात काम करत असल्याचा आरोप

पुणे अपघातातील मुलाची बाल निरीक्षण गृहात पोलीस करणार चौकशी, कोठडी संपण्याआधी परवानगी मिळताच पोलीस करणार अल्पवयीन मुलाची चौकशी

मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा, 
मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम
वेळेआधीच पूर्ण, तर सीएसएमटी स्थानकावर आज रात्रीपासून ३६ तासांचा ब्लॉक

कांदा उत्पादकांनी बंद पाडली लासलगावातली खासगी बाजार समिती, कांदा निर्यातशुल्काबाबत कर्नाटक, गुजरातला एक न्याय, महाराष्ट्रावर अन्याय का, शेतकऱ्यांचा सवाल

आव्हाडांना पाठिंबा देण्याचं भुजबळांचं वक्तव्य दुर्दैवी, हसन मुश्रीफांचा घरचा आहेर तर वरिष्ठांचं ऐकायला हवं, भुजबळांची प्रतिक्रिया

आचारसंहिता शिथील करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाचा नकार, नवी लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता शिथील होणार नाही, आयोगाने फेटाळली सरकारची विनंती

राज्यात पाणीटंचाईचं भीषण संकट...धरणांमध्ये केवळ २२.४३ टक्के पाणीसाठा.... तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी ९ टक्के पाणीसाठा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram