ABP Majha Headlines : 01 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

प्रचार संपता संपता राहुल गांधींचा तिजोरी बॉम्ब, मोदींच्या 'एक है तो सेफ है'ची खिल्ली, पत्रकार परिषदेत तिजोरीतून काढले मोदी-अदानी आणि धारावीचे पोस्टर

सरकार आल्यानंतर अदानींसाठीचे जीआर फाडणार हे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य योग्यच, पत्रकार परिषदेत राहुल गांधींकडून ठाकरेंशी सहमती...

मेट्रोचं काम पूर्ण होण्याआधीच रंगरंगोटी, आदित्य ठाकरेंचा आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागातच घोटाळ्याचा आदित्य ठाकरेंचा दावा

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांकडून आपल्याच उमेदवाराचा हिरमोड, सिंदखेडराजामध्ये शिवसेनेच्या शशिकांत खेडेकरांना पाठिंबा, राष्ट्रवादीच्या मनोज कायंदेंची पंचाईत

विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस, अधिसूचनेपासून तब्बल २८ दिवस प्रचाराच्या तोफा, सर्व नेत्यांच्या आपापल्या होमग्राऊंडवर सभा, रॅली आणि पदयात्रा

सुरेश वाडकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकरसह मराठी कलाकार आशिष शेलारांच्या प्रचारात, शेलारांकडून कलाकारांचे आभार

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नाशिकमधील हॉटेलवर भरारी पथकाचा छापा, पाच कोटींहून अधिकची रक्कम जप्त, गाडीही ताब्यात

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola