ABP Majha Headlines : 01 PM : 16 Jully 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून पोलिसांची मनाई, जमावबंदी असल्याने शाहू महाराज आणि सतेज पाटलांना पांढरेपाणी परिसरात अडवलं

राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार शरद पवारांचं घर असलेल्या मोदीबागेत, नणंद नीता पाटलांना भेटायला गेल्याची राष्ट्रवादीचे प्रवक्त सूरज चव्हाण यांची माहिती

३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट, गैरव्यवहार झाला नसल्याचा चौकशी समितीचा अहवाल

क्रॉस व्होटिंगच्या आरोपांसंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे
तक्रार करणार, काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांचं स्पष्टीकरण, आदेशानुसार मतदान केल्याचा दावा

पूजा खेडकर प्रकरणाच्या तपासाला वेग,  नॉन क्रिमिलेयर दाखल्याची वैधता तपासण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मागवले कुटुंबीयांचे इन्कम टॅक्स रिपोर्ट

वाशिम पोलिसांनी कोणतीही चौकशी केली नाही,काही माहिती देण्यासाठी स्वत:च पोलिसांना बोलावलं, पूजा खेडकर यांचं स्पष्टीकरण

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांच्या वक्तव्यावरून पेटला वाद, साधू महतांची अविमुक्तेश्वरानंदांवर टीका, उद्धव ठाकरेंनीच हिंदुत्वाला धोका दिल्याचा आरोप

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन
आरोपींना जामीन, ६ वर्षांपासून कैदेत असल्याने जामीनास पात्र असल्याचा युक्तिवाद

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील पुलाला भगदाड, १५ दिवसांपासून मुंबईला येणाऱ्या २ मार्गिका बंद, महामार्ग प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष

सर्वधर्मीय यात्रा योजनेत हिंदूंचीच बहुसंख्य तीर्थक्षेत्र हे लांगुलचालन नाही का?... राज्य सरकारच्या योजनेवर एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींचा सवाल

सर्व संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या भेटीसाठी वाखरीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार, संत मुक्ताई आणि संत नामदेव महाराज करणार पारंपरिक स्वागत

घाटकोपर होर्डिंग प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जबाबदारीची टोलवाटोलवी, आजी-माजी रेल्वे पोलीस आयुक्त आमने-सामने

मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीवर उतारा, अवजड महामार्गांसाठी वेळमर्यादा, तातडीने खड्डे बुजवण्याचेही दादा भुसेंचे निर्देश

आता देवालाच आदेश द्यायचा का?, सांगली, कोल्हापूर पूरस्थितीवरुन हायकोर्टाचे सरकारला खडे बोल, सरकारच्या सुस्त प्रशासकीय यंत्रणावर नाराजी

जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांचा जवानांवर हल्ला, कॅप्टनसह पाच जवान शहीद, काश्मीर टायगर्सने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस, तीन उमेदवार रिंगणात, संजय नाईक आणि
अजिंक्य नाईक यांच्यात मुख्य लढत

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram