ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 14 July 2024 Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 14 July 2024 Marathi News

राज्यभरातील पावसाच्या बातम्या 

Rain Superfast update News : 02 PM 14 July 2024 : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस-पाण्याच्या बातम्या

मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्याला रेड अलर्ट, पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट.

हवामान विभागाकडून सिंधुदुर्गसाठी आज रेड अलर्ट जारी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, सध्या जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु. 

सिंधुदुर्गात कालपासून मुसळधार पावसाच्या सरी,  वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावरील होडावडे पूल आणि कुंदे येथील पुलावर पाणी, कळसुली मार्गावरील वाहतूक बंद. 

रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये मुसळधार पाऊस, मंडणगड भिंगळोली एसटी डेपो परिसरात साचलं पाणी, 
भात शेतीही पाण्याखाली. 

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडला मुसळधार पावसाचा तडाखा. जगबुडी आणि नारंगी नदीला पूर. जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, नारंगी नदीला पूर आल्यामुळं खेड दापोली मार्गावरची वाहतूक बंद होण्याची शक्यता.

मुसळधार पावसाने खेडची जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर, खेडच्या मटण मार्केटमध्ये शिरलं पाणी, नगर परिषदकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram