ABP Majha Headlines 8 PM 15 Sep 2024 Maharashtra News

Continues below advertisement

विरोधकांनी मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, नागपुरात पत्रकारांच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट.

पंतप्रधान होणं हा माझ्या आयुष्याचा उद्देश नाही, तर विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांकडून पंतप्रधानपदाचा प्रस्ताव आल्याचाही नितीन गडकरींकडून दावा.  

गडकरींकडे कोणी भूमिका मांडली असेल तर त्यात गैर काय?, ठाकरे गटाचे खासदार राऊत संजय राऊतांचा सवाल. 

नितीन गडकरींसारख्या नेत्याची देशाला गरज, गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल,  सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, 

ऑफर देणाऱ्याचं नाव गडकरींनी सांगयला हवं,  गडकरी पंतप्रधान होणार असतील तर आनंदच, नाना पटोलेंचं वक्तव्य. 

सध्या तरी देशासाठी नरेंद्र मोदीच हे एकमेव ऑप्शन, गडकरींनी पंतप्रधानपदाबाबत केलेल्या वक्तव्यावर मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. 

'मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न तेव्हाही पाहिलं नव्हतं आणि आताही नाही, शिर्डीत पेन्शनधारकांच्या महाधिवेशनात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram