ABP Majha C voter Survey : देशात एनडीएचा झंझावात कायम, मोदी हॅटट्रीक करण्याची शक्यता
ABP Majha C voter Survey : देशात एनडीएचा झंझावात कायम, मोदी हॅटट्रीक करण्याची शक्यता देशात एनडीए पर्यायाने भाजपचा झंझावात कायम असल्याचं चित्रं दिसतंय. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रीक करण्याची दाट शक्यता आहे. एबीपी माझा आणि सी व्होटरच्या अंतिम ओपिनियन पोलनुसार देशात एनडीए ३७३ जागा मिळवण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला १५५ जागांपर्यंत मजल मारता येईल असं सध्या दिसतंय. विशेष म्हणजे एनडीएच्या २०१९ च्या जागांचा विचार करता साधारणपणे ३४ जागांची वाढ होत आहे. २०१९ मध्ये एनडीएने ३४७ जागांपर्यंत मुसंडी मारली होती. तर गेल्यावेळी यूपीएला केवळ ९३ जागा मिळाल्या होत्या.