Abdul Sattar : टीईटी प्रकरणानंतर मंत्री अब्दुल सत्तार आणखी एका वादात ABP Majha
टीईटी प्रकरणानंतर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणखी एका वादात सापडण्याची शक्यता आहे... सत्तार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सिल्लोड प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी कोर्टाने पोलिसांना हे आदेश दिलेत.. सत्तारांनी प्रतिज्ञापत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अर्हतेबाबत तफावत असलेली माहिती सादर केल्याचा आरोप होतोय. सिल्लोडचे महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी तक्रार दिली होती... या प्रकरणी याआधीही कोर्टाने पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.. मात्र पोलिसांनी भ्रामक, त्रुटीयुक्ती अहवाल देऊन सत्तारांना अभय दिल्याचं तक्रारदारांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर सिल्लोड कोर्टानं पुन्हा एकदा पोलिसांना चौकशीचे आदेश दिलेत.... याप्रकरणी चौकशी करुन ६० दिवसात अहवाल सादर करण्यात आदेश कोर्टाने दिलेत..