Abdul Sattar on Vikhe Patil : आतल्या गाठीचे नेते म्हणजे विखे पाटील, ये दोस्ती हम नाही तोडेंगे!
एकीकडे राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरू असताना आज राज्याचे सेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपचे राधाकृष्ण विखे एकाच मंचावर आले. निमित्त होत राहाता तालुक्यातील कोल्हार येथील जिल्हा परिषद शाळा भूमिपूजन सोहळ्याचे. बांधा व हस्तांतरित करा ही भूमिका घेत आज राहाता तालुक्यातील कोल्हार येथे शाळेच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं यावेळी सेनेचे राज्यमंत्री व विखे यांचे समर्थक अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान घेत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भूमिपूजन सोहल्यानतर रंगलेल्या भाषणात एकमेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर याच कार्यक्रमात एका लाभार्थी व्यक्तीने गोधळ घालण्याचा प्रयत्न केला असता अब्दुल सत्तार यांनी भाषणातून च मी घर बांधून देतो अस सांगितलं.