Farmers Protest : करनालमध्ये आज शेतकऱ्यांची महापंचायत, महापंचायत रोखण्यासाठी सरकारचे निर्बंध
उत्तरप्रदेशमधल्या मुझफ्फरनगरमध्ये शेतकऱ्यांची महापंचायत यशस्वी झाल्यानंतर आज हरियाणामधल्या करनालमध्ये आणखी एक महापंचायत होणार आहे. या महापंचायतीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या भाजप सरकारने जमावबंदी लागू केलीय. आणि इंटरनेट सेवा बंद केलीय. प्रचंड फौजफाटा आणि नीम लष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात.