Pune : राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीनिमित्त आरतीचे आणि तिथेच रोजा इफ्तारचे आयोजन

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्या पुण्यातील कोथरुड भागातील दुधाने लॉन्स या ठिकाणी दिवसभर पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या आढावा बैठका होणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सकाळी दहा वाजल्यापासून  दिवसभर या बैठकांना उपस्थितीत राहणार आहेत तर दुपारच्या सत्रात अजित पवार आणि सुप्रिया सुळे या देखील या बैठकांना उपस्थित राहणार आहेत.  या बैठकीनंतर संध्याकाळी पावणे सात वाजता राष्ट्रवादीच्या पुणे शहर आघाडीकडून दुधाने लॉन्सच्या समोर असलेल्या हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त आरतीचे आणि तिथेच रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी जयंत पाटील यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आलीय आणि जयंत पाटील यांनी ती मान्य केलीय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram