Uniform Civil Code : समान नागरी कायद्यावरुन विरोधकांमध्येच फूट? प्रकरण काय? ABP Majha

आम आदमी पक्षानं समान नागरी कायद्याचं समर्थन केलं आहे. मात्र, सर्व धर्मांशी चर्चा करून सहमतीनंच हा कायदा करण्यात यावा, असं आम आदमी पक्षाचे प्रवक्ते संदीप पाठक म्हणाले. समान नागरी कायद्याचं आम्ही तत्वतः समर्थन करतो, हा कायदा असावा असं घटनेच्या कलम ४४मध्ये देखील लिहिलंय. मात्र सर्व धर्मियांची याला संमती हवी, अशी आपची भूमिका आहे. दरम्यान समान नागरी कायदा आणणे हा राजकीय डाव असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणालेत, तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समान नागरी कायदा आणण्याचा प्रकार आहे, असंही ते म्हणालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola