Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?

Continues below advertisement

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?

राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर (Dhanagar) समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज चक्क विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह दोन आदिवासी आमदारांनी मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीवर उड्या घेतल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार झिरवाळ यांच्या या निषेध आंदोलनावर आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून टीका होत आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाच, आमदारांना, विशेष म्हणजे विधानसभा उपाध्यक्षांना अशाप्रकारे जाळीवर उड्या माराव्या लागत असतील तर सर्वसामान्यांचं काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत कठोर शब्दात या नरहरी झिरवाळ यांच्या निषेध आंदोलनावर भाष्य केलंय. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी , आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध ?,असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram